आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संजीवन विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम.

संजीवन विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम.

पन्हाळा :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील संजीवन विद्यालय या निवासी प्रशालेचा इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. प्रशालेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली 100% निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.

अजिंक्य नवनाथ पाटील याने 97.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. आर्यन सत्यवान पवार याने 90.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर 89.40% गुण मिळवून सुदर्शन संदीप देसाई याने तृतीय क्रमांक मिळवला.

परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली असून 30विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन पी.आर.भोसले,सहसचिव एन. आर.भोसले, क्रीडा संचालक सौरभ भोसले यांचे प्रोत्साहन व प्राचार्य महेश पाटील, समन्वयक सचिन इनामदार,सुगंध देवकुळे वर्गशिक्षक धनंजय पाटील व विवेक कांबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

nynavabharatnews.live

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??